एक टन शेणखतापासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण...

              🪴 वर्ल्ड शेतकरी ऑर्गनायझेशन 🪴


❇️ एक टन शेणखतापासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण ❇️ 


एक टन शेणखत जमिनीत मिसळल्यास सहा ते सात किलो नत्र, तीन ते चार किलो स्फुरद व सात-आठ किलो पालाश जमिनीला मिळतो. या सोबतच एक किलो गंधक, २५० ग्रॅम मँगेनिज, १०० ग्रॅम जस्त, ७५ ग्रॅम लोह, २५ ग्रॅम बोरॉन आणि दोन ग्रॅम मॉलिब्डेनम इतकी अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात.


1) नत्र - 5.6 किलो

2) स्फुरद - 3.5 किलो

3) पालाश - 7.8 किलो 

4) गंधक - 1 किलो

5) मंगल - 200 ग्रॅम

6) जस्त - 96 ग्रॅम

7) लोह - 80 ग्रॅम

8) तांबे - 15.6 ग्रॅम 

9) बोरॉन - 20 ग्रॅम

10) मॉलिब्डेनम - 2.3 ग्रॅम

11) कोबाल्ट- 1 ग्रॅम


*शेणखताची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय योजना :-*

1) शेणखत पूर्णपणे कुजवण्यासाठी कंपोष्ट कल्चरचा वापर 1 टन शेणखतासाठी 1 किलो किंवा 1 लिटर या प्रमाणात करावा.

2) अर्धवट कुजलेले शेणखत हे भाजीपाला पिकामध्ये वापरल्यास त्या ठिकाणी शेणखत कुजताना उष्णता निर्माण होऊन सूक्ष्मजीवांच्या संख्येवर व भाजीपाल्याच्या मुळांवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो पूर्णपणे कुजलेले शेणखतच वापरावे.

3) शेणखतातुन बुरशीजन्य रोगाचा प्रसार होऊ नये. म्हणून शेणखतात ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स, यासारख्या जैविक घटकांचा वापर करावा.

4) शेणखतापासून गांडूळखत तयार करून फळबागेस दिल्यास अधिक फायदेशीर ठरते. शेणखत फळबागेस देताना झाडाच्या बाजूला खड्डा घेऊन नंतर मातीने बुजवून टाकावे शेणखत मातीच्या संपर्कात आल्यास लवकर कुजण्यास मदत होते.

5) गोठ्यातील शेण हे खड्डा घेऊन त्यात साठवून त्यावर पाणी टाकून व कंपोष्ट कल्चरचा वापर करून चांगले कुजवून घेऊन ते शेतात मिसळून पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढवता येईल.



         🪴 *वर्ल्ड शेतकरी ऑर्गनायझेशन* 🪴

           World Shetkari Organization


❇️ Facebook Page :- https://www.facebook.com/AgroTechnology8881?mibextid=ZbWKwL


❇️ Facebook Group :- https://www.facebook.com/groups/741604163332568/?ref=share_group_link

Comments

Popular posts from this blog

BEST BGMI Montage Thumbnail In 2023

BGMI Unban Date : खुशखबरी! BGMI की वापसी को लेकर कंपनी जल्द करेगी ऐलान, जानें पूरी खबर इस दिन री-लॉन्च होगा Battle Ground Mobile India

बीजप्रक्रिया म्हणजे काय ?